भारतीय सैन्याने आज लष्कर दिन केला साजरा

आज भारतीय सैन्याने लष्कर दिन साजरा केला. दिल्लीत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी अमर ज्योती येथे जाऊन मानवंदना दिली. यावेळी शूर वीर जवानांना सन्मानित करण्यात आलं. 

Updated: Jan 15, 2018, 11:27 AM IST
भारतीय सैन्याने आज लष्कर दिन केला साजरा title=

नवी दिल्ली : आज भारतीय सैन्याने लष्कर दिन साजरा केला. दिल्लीत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी अमर ज्योती येथे जाऊन मानवंदना दिली. यावेळी शूर वीर जवानांना सन्मानित करण्यात आलं. 

‘तोवर लष्कर शांत बसणार नाही’

लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरबाबत आपली मतं पुन्हा नोंदवली. जोवर जम्मू काशमीरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर भारतीय लष्कर शांत बसणार नाही. खो-यात शांत प्रस्थापित करण्यासाठी रणनिती तयार करणं आवश्यक आहे, सैन्य अभियानं वाढवणं गरजेंच आहे असंही ते म्हणाले. 

पाकिस्तानची पुन्हा धमकी

लष्कर दिनाच्या एक दिवस आधीच रावत यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यावरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकीही दिली होती.