रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!

Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2024, 12:54 PM IST
रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!  title=
indian railways waiting list check train ticket code get confirm ticket from irctc website

Waiting Ticket Rules: भारतता दर दिवसाला 10 हजाराहून अधिक ट्रेन धावतात. मात्र, अनेकदा सुट्टीच्या दिवसात आणि सणा-सुदीला ट्रेनचे कन्फर्म तिकिट मिळणे अवघड जाते. अशावेळी अनेकदा तुम्हाला वेटिंग तिकिट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहावी लागते. मात्र, तुम्हाला माहितीये का, रेल्वे वेगवेगळ्या प्रकारचे वेटिंग तिकिट जारी करतात. यातील सर्व वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता वेगवेगळी असते. अशावेळी तुमचे वेटिंग तिकिट कन्फर्म कसे होईल आणि त्यासाठी किती काळ वाट पाहावी लागेल, याची सर्व माहिती जाणून घ्या. 

तुम्ही कधी तुमचे वेटिंग तिकिट लक्षपूर्व पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की, रेल्वे त्यावर GNWL, RLWL सारखे अनेक कोड लिहलेले असतात. वेटिंग तिकिटवर लिहलेले हे कोड नेमके काय असतात आणि त्याचा अर्थ काय. तुमचे तिकिट कन्फर्म होण्यासोबत याचा काही थेट कनेक्शन असतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 

RAC (Reservation Against Cancelation)

जर तुम्हाला RAC तिकिट मिळाले आहे. तर याचा अर्थ तुमचे तिकिट कन्फर्म झाले आहे. तुम्ही या ट्रेनने प्रवास करु शकता. मात्र तुमची सीट दोघांमध्ये वाटली जाते. याचा अर्थ तुम्हाला बसायला जागा मिळू शकते मात्र स्लीपर कोच मिळणार नाही. मात्र,  RAC तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते. 

GNWL (General Waiting List)

वेटिंग लिस्टमध्ये सर्वात कॉमन कोड असतो तो म्हणजे GNWL. याचा अर्थ जनरल वेटिंग लिस्ट. हे तिकिट ट्रेन ज्या स्थानकातून प्रवास सुरु करणार आहे त्या स्थानकासाठी जारी केले जाते. GNWL कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण ज्या स्थानकातून ट्रेन सुटणार आहे तिथे सर्वाधिक बर्थ असतात. 

RLWL (Remote Location Waiting List)

RLWL तिकिटाचा अर्थ रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट आहे. प्रवाशांना वेटिंग तिकिट तेव्हा दिलं जातं. जेव्हा तिकिट पहिल्या व शेवटच्या स्थानकांव्यतिरिक्त मार्गातील आसपासच्या स्थानकांसाठी बुक केले जाते. GNWLच्या तुलनेत हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता थोडी कमी असते. कारण मधल्या स्थानकांसाठी कोणतेही दुसरे आरक्षण नसते. 

PQWL (Pooled Quota waiting List)

पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये मधल्याच एखाद्या स्थानकातून चढणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी असते. 

TQWL (Tatkal Quota Waiting List)

तात्काळ कोटो वेटिंग लिस्ट म्हणजेच तात्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकिट न मिळणाऱ्या प्रवाशांना हे तिकिट दिले जाते. असे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता नसतेच. कारण रेल्वेकडे यासाठी वेगळा कोटाच नसतो. तसंच, यात प्रवाशी तिकिट रद्द करण्याची शक्यतादेखील नसते. 

RSWL (Road Side Waiting List)

RSWL कोडचा अर्थ रोड साइड स्टेशन वेटिंग लिस्ट. जेव्हा ट्रेनच्या मूळ स्थानकावरून जवळच्या स्थानकांवर तिकीट बुक केले जाते, तेव्हा त्या तिकिटावर RSWL कोड लिहिलेला असतो. अशी तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.