रेल्वेने सुरु केली ही सुविधा, कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा

जर तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता तर रेल्वेच्या नव्या सुविधांचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो.

Updated: May 29, 2018, 12:31 PM IST
रेल्वेने सुरु केली ही सुविधा, कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा title=

मुंबई : जर तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता तर रेल्वेच्या नव्या सुविधांचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो. रेल्वेच्या तिकीट बुकिंगदरम्यान जर तुमचे तिकीच कन्फर्म होणार की नाही याबाबत साशंक असाल तर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तुम्ही ही माहिती मिळवू शकता. यावरुन तुम्ही हेही जाणून घेऊ शकता की तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे प्लानिंग करणे सोपे होऊ शकते. आयआरसीटीसीकडून सोमवारी मध्यरात्रीपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 

सीएसआयएसवर सुरु करण्यात आलीये सर्व्हिस

आयआरसीटीसीच्या या नव्या सिस्टीमला सेंट्रल फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम क्रिसवर आधारित बनवण्यात आलीये. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमुले वेटिंग लिस्ट वा आरएसी तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकेल. याप्रकारचे फीचर रेल्वेकडून पहिल्यांदाच सुरु केले जातेय. 

रेल्वेमंत्री पियुष गोयस यांनी ही सेवा सुरु करण्यासाठी एक वर्षाची डेडलाईन दिली होती. खासगी वेबसाईटवरुन अशा प्रकारची माहिती मिळते. मात्र ही सुविधा रेल्वेने सुरु केल्यास त्याचा फायदा अनेकांना होईल असा दावा एका अधिकाऱ्याने केलाय. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन दररोज तब्बल १३ लाख तिकीटे बुक केली जातात. तर १०.५ लाख बर्थ रिझर्व्हेशनची रेल्वेची क्षमता आहे.

लॉगइन न करताही मिळणार माहिती

आयआरसीटीसीकडून आणखी एक सर्व्हिस सुरु करण्यात आलीये. सोमवारी मध्यरात्रीपासून ही सर्व्हिस सुरु करण्यात आलीये. या सर्व्हिसद्वारे तुम्ही लॉग इन न करता ट्रेनचे तिकीटच उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळवू शकता. याआधी तिकीटांच्या उपलब्धतेची माहिती मिळवण्यासाठी लॉग इन करणे गरजेचे असे. मात्र या नव्या सुविधेमुळे तुम्हाला तिकीटांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी लॉग इन करण्याची गरज नाही.