Indian Railway : जगभरातील रेल्वे क्षेत्रामध्ये भारतीय रेल्वे विभागाचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं. देशाची भौगोलिक रचना आणि एकंदर प्रवासीसंख्या पाहता देशात आतापर्यंत झालेला रेल्वेचा विकास सातत्यानं प्रशंसेस पात्र ठरताना दिसत आहे. अशा या रेल्वे प्रवासामध्ये लोकलपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांपर्यंतची सुविधा रेल्वे विभाग देताना दिसतो.
देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या रेल्वेच्या माध्यमातून अगदी सहज करता येते. पण, तुम्हाला माहितीये का, संपूर्ण देशात एक रेल्वेप्रवास असाही आहे जो त्याच्या कमीत कमी वेळामुळं कायमच चर्चेचा विषय ठरतो. अवघ्या 3 किलोमीटरसाठीचा हा रेल्वेप्रवास आहे महाराष्ट्रातील नागपूर ते अजनीदरम्यानचा.
3 किमी अंतराच्या या प्रवासासाठी रेल्वेकडून विविध श्रेणींमध्ये तिकीट उपलब्ध करून दिलं जातं. यामध्ये जनरल क्लासचं तिकीट 60 रुपये, तर स्लीपर क्लासचं तिकीट 145 ते 175 रुपये इतकं आहे. एसी 3 टियरचं तिकीट 555 तर, एसी 2 टियरचं तिकीट 760 रुपये इतरं आहे. फर्स्ट क्लासच्या तिकीटासाठी इथं 1255 रुपये मोजावे लागतात. जाणून आश्चर्य वाटेल पण, ही इतकी रक्कम अवघ्या 9 मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावी लागते.
नागपूर ते अजनी हा प्रवास लहान असला तरीही या प्रवासादरम्यान प्रवाशांना सर्व सुविधा पुरवण्याचा रेल्वेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. स्थानिक रहिवाशांसाठी ही रेल्वे प्रवासाचं एक महत्त्त्वाचं माध्यम असून, याचा फायदा अनेक रुपांमध्ये प्रवासी घेताना दिसतात. प्रवासवेळ कमी असल्यामुळं या ट्रेनसाठी अनेकजण सामान्य बोगीतूनच प्रवास करण्याला प्राधान्य देतात. पण, हे तिकीटांचे दर आहेत की नाही भुवया उंचावणारे?