तुम्हाला माहितीये का?, भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स 'या' 5 देशांमध्येही चालतं!

 तुम्हाला माहित आहे का तुम्ही भारताच्या लायसन्सवर परदेशातही वाहन चालवू शकता. 

Updated: Aug 30, 2022, 11:06 PM IST
तुम्हाला माहितीये का?, भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स 'या' 5 देशांमध्येही चालतं! title=

Indian Driving Licence : भारतामध्ये 18 वर्षानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढता येतं. तुम्ही भारतामध्येही कुठेही वाहन चालवू शकता.  पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही भारताच्या लायसन्सवर परदेशातही वाहन चालवू शकता. असे 5 देश आहेत की तिथं भारताच्या 
(Driving Licence) लाही परवनगी आहे. 

युनायटेड स्टेट्समधील बहुतेक राज्यात तुम्हाला भारताच्या लायसन्सवर भाड्याने कार चालवण्याची परवानगी देतात. तुम्ही 1 वर्षासाठी गाडी चालवू शकता. पण यासाठी तुमच्याकडची आवश्यक कागदपत्रे असायला हवीत. कागदपत्रांमध्ये वाहन चालकाची माहिती असावी. भारताच्या लायसन्ससोबत तुम्हाला I-94 फॉर्म सोबत ठेवावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही USA मध्ये प्रवेश केल्याची तारीख असते.

न्यूझीलंडमध्येही तुम्ही एका वर्षासाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर वाहन चालवू शकता. मात्र या देशात तुमचं वय 21 वर्षे असणं गरजेचं आहे. 

भारताचे शेजारी देश असलेल्या भूतानशी चांगले संबंध आहेत. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सव नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशातही तुम्ही गाडी चालवू शकता. 

जर्मनीला ऑटोमोबाईल्सचा देश म्हटलं जातं. इथं तुम्ही भारतीय लायसन्सवर 6 महिने ड्रायव्हिंग करता येते. मात्र तुम्हाला तिथल्या नियमानुसार रस्त्याच्या उजव्या बाजुने वाहन चालावायला लागतं. 

कॅनडालामध्ये भारताच्या ड्रायव्हिंग लायसन्सला परवानगी आहे. कॅनडाला मिनी पंजाब म्हटलं जातं. इथंसुद्धा तुम्हाला उजव्या बाजुने वाहन चालावायला लागतं.