झोप झाली नसेल तर आता ऑफिसमध्ये येऊन झोपा; भारतीय कंपनीचा मोठा निर्णय

 कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, कर्मचारी आता त्यांची अपूरी झोप ऑफिसमध्ये घेऊ शकणार आहे. 

Updated: May 9, 2022, 07:55 AM IST
झोप झाली नसेल तर आता ऑफिसमध्ये येऊन झोपा; भारतीय कंपनीचा मोठा निर्णय title=

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असलेल्या व्यक्तींना अनेकदा झोप पूर्ण होत नसल्याने ऑफिसला येण्याचा कंटाळा येतो. अशावेळी कर्मचारी ऑफिसमध्येही झोप उडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र याऐवजी जर तुम्हाला ऑफिसमध्ये काही वेळ झोपायची परवानगी दिली तर? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण आम्ही म्हणतो की, हे शक्य आहे, जर तुम्ही या कंपनीमध्ये कामाला असाल तर...

एका भारतीय कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीये. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे, कर्मचारी आता त्यांची अपूरी झोप ऑफिसमध्ये घेऊ शकणार आहे. कदाचित तुमचाही यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

वेकफिट सोल्यूशन्स (Wakefit Solutions) असं या भारतीय कंपनीचं नाव आहे. या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल केला आहे. या मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कर्मचारी आता ऑफिसमध्ये अर्धा तास झोप घेऊ शकणार आहेत.

मुळात या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अधिकृत वेळंही जाहीर केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये या नव्या सुविधेचा लाभ घेता येणारे. यामुळे कर्मचारी निरोगी राहतील आणि कामंही अधिक होण्यास मदत होईल, असं कंपनीचे म्हणणं आहे. ऑफिसमधील कर्मचारी दुपारी 2 ते 2.30 पर्यंत झोप घेऊ शकणार आहेत.