नवी दिल्ली : म्यानमारमध्ये घूसून भारतीय लष्करानं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. एनएससीएन केचे अनेक दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहाटे पावणे पाचच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. एनएससीएन ही स्वतंत्र नागालँडसाठी लढणारी संघटना आहे. नॅशनलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड असं संघटनेचं नाव आहे. म्यानमारमधून या संघटनेचे दहशतवादी भारतीय लष्करावर नियमितपणे छोटेमोठे हल्ले करत असतात. त्यामुळे भारतीय जवानांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे.
पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. इंडो-म्यानमार सीमेजवळील लंगखू गावाजवळ भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.