... म्हणून होतेय भारतीय सेना महिला अधिकाऱ्यांची वाहवा !

सेना अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव 

Updated: Dec 30, 2019, 09:37 AM IST
... म्हणून होतेय भारतीय सेना महिला अधिकाऱ्यांची वाहवा ! title=

चंदीगढ : भारतीय सेनेच्या Indian Army  दोन महिला कॅप्टन Captains ऑफिसर्सची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे. शनिवारी हावडा एक्सप्रेसमधून Howrah Express प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेला Pregnant Women प्रसूती कळा सुरू झाल्या. अशा परिस्थितीत ट्रेन थांबवून त्या महिलेला रूग्णालयात दाखल करण शक्य नव्हतं. अशावेळी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या भारतीय सेनेच्या दोन महिला अधिकारी गर्भवती स्त्रीच्या मदतीकरता धावून आल्या. 

दोन नर्स ऑफिसर कॅप्टन ललिता आणि अमनदीप यांनी मोठा धोका पत्करत धावत्या एक्सप्रेसमध्ये गर्भवती महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं म्हणजे गर्भवती कोमलची नॉर्मल डिलिव्हरी करत तिच्या गोंडस मुलीला जीवनदान दिलं. भारतीय सेनेने आपल्या ट्विटर हँडलवरून बाळाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. 

दोन महिला अधिकारी हावडा एक्सप्रेसमधून लखनऊ येथील आपल्या बेसिक नर्सिंग ऑफिसर्स कोर्स करता जात होत्या. त्या बी-वन या डब्यातून प्रवास करत होते. त्याच डब्यातून 21 वर्षीय गर्भवती कोमल आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होती. 

एक्सप्रेस नझीबाबाद आणि मुरादाबादच्या मध्ये पोहोचली तेव्हा पहाटेचे 3.50 झाले होते. यावेळी कोमलला प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे ती ओरडू लागली. त्याचवेळी भारतीय सेनेच्या या दोन महिला अधिकारी तिच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी धावत्या ट्रेनमध्येच कोमलची प्रसूती केली आणि कोमलने गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी मुरादाबाद स्टेशनवर देखील याबाबतची माहिती देऊन सूचित करण्यात आलं. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासणी करून कोमलला पुढील प्रवास करण्याची परवानगी दिली.