देशभरात २४ तासांत ७३ हजार २७२ नवे रुग्ण, ९२६ मृत्यू

देशभरातील एकूण ६९ लाख ७९ हजार ४२४ करोनाबाधित

Updated: Oct 10, 2020, 11:56 AM IST
 देशभरात २४ तासांत ७३ हजार २७२ नवे रुग्ण, ९२६ मृत्यू title=

मुंबई : कोरोनच नवीन रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ७३ हजार २७२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९२६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६९ लाख ७९ हजार ४२४ पर्यंत पोहोचली आहे. 

देशभरातील एकूण ६९ लाख ७९ हजार ४२४ करोनाबाधितांच्या संख्येत ८ लाख ८३ हजार १८५ ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले ५९ लाख ८८ हजार ८२३ जण आहेत. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १ लाख ७ हजार ४१६ जणांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यात सध्या अनलॉकचा ५ वा टप्पा सुरू आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाने महाराष्ट्र शिरकाव केला. यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे १२,१३४ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ३०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

आता राज्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितलं आहे. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितल.

नियम पाळणं खूप महत्वाचं त्यामुळे सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे महत्वाचं आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आता शाळा, मंदिरं टप्प्यांमध्ये उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. जिम टप्प्याटप्यात उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.