भारत-चीन सीमेवर झटापट; चीनचे २० जवान जखमी

पूर्व लडाखपाठोपाठ आता हा संघर्ष सिक्कीममध्ये उफाळलाय 

Updated: Jan 25, 2021, 12:21 PM IST
भारत-चीन सीमेवर झटापट; चीनचे २० जवान जखमी  title=

मुंबई : भारतात घुसखोरी करून भारतीय प्रदेश गिळंकृत करण्याचा चीनचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय जवानांनी हाणून पाडला. पूर्व लडाखपाठोपाठ आता हा संघर्ष सिक्कीममध्ये उफाळलाय आहे. सिक्कीमच्या नाकुला सीमेवर चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. भारतीय पेट्रोलिंग पथकांनी चीनच्या या पथकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान दोन्ही पथकांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. एकमेकांशी हाणामारी आणि दगड फेकून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष उफाळला. हाणामारीत चीनचे २० सैनिक जखमी झाले तर  भारताचे 4 सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडलाय.

भारत आणि चीन यांच्यातल्या मॅकमोहन सीमेवरील नाकुला पास हा अतिशय संवेदनशील एरिया समजला जातो. मॅकमोहन रेषा चीनला मान्य नाही त्यामुळे सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशातल्या अनेक पोस्टवर चीन वारंवार हक्क सांगते. मात्र यावेळी आता चीनने नाकुला सीमा भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा हा प्रयत्न हाणून पाडला.