अभिमानाचा क्षण : १५ देशांमध्ये भारतीय ठरले Rule Maker

जगभरातील 15 देशांमध्ये भारतीय  नियम तयार करतात.  

Updated: Feb 16, 2021, 09:54 AM IST
अभिमानाचा क्षण : १५ देशांमध्ये भारतीय ठरले Rule Maker  title=

वॉशिंग्टन : भारताने संपूर्ण देशात आपलं वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. फक्त भारतातच भारतीय नियम तयार करत नाहीत, तर इतर देशांमध्ये भारतीयांनी स्वतः तयार केलेले नियम लागू होतात. एकंदर पाहता हा क्षण सगळ्याचं भारतीयांसाठी आभिमानाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकताच जाहीर झालेल्या एका यादीमुळे समस्त देशातील भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. यादीमध्ये सांगितल्या प्रमाणे भारतीय मूळाचे 200 पेक्षा जास्त भारतीय 15 देशांमध्ये उच्च पदांवर लोकसेवेचे कार्य करत आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे यांपैकी 60 भारतीयांनी मंत्रीमंडळात आपली जागा बनवली आहे. संबंधीत माहिती '2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्स'ने (2021 Indiaspora Government Leaders List) जारी केली आहे. सरकारी वेबसाइट्स आणि इतर सार्वजनिकरित्या उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली. 

‘इंडियास्पोरा’ चे संस्थापक, उद्योगपती आणि गुंतवणूकदार एम आर रंगस्वामी (MR Rangaswami) यावेळी म्हणाले. 'हा भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. जगातील सर्वात जुना लोकशाही देश अमेरिकेच्या पहिली महिला आणि उपराष्ट्रपती भारतीय वंशाच्या आहेत ही अभिमानाची बाब आहे.'

यादीत नाव येताच अमेरिकन खासदार अमी बेरा म्हणाल्या, 2021 इंडियास्पोरा गव्हर्मेंट लीडर्सच्या यादीत माझं नाव येणं ही अत्यंत गर्वाची बाब आहे. संसदेत प्रदीर्घ काळ सेवा देणारी खासदार म्हणून मला भारतीय-अमेरिकन समुदायाचा नेता असल्याचा अभिमान आहे. 

एमआर रंगस्वामी पुढे म्हणाले की, यादीतील भारतीय सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय लोक आपले वर्चस्व जगभर पसरवत आहेत. या यादीत आलोक शर्माचादेखील समावेश आहे. शर्मा हे यूकेचे कॅबिनेट मंत्री आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदचे अध्यक्ष आहेत.