हैदराबाद: तेलंगणातील हैदराबाद येथे एका दारूड्या बापाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे. या बापाने आपल्या ३ वर्षाच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे ऑटोरिक्षावर आपटले. मुलाला एखाद्या वस्तूप्रमाणे हवेत फिरवत रिक्षावर आपटतानाच्या या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करू शकतो. व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती एका लहान मुलाला ऑटोरिक्षावर आपटते आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना घटनास्थळी एक पोलीस कर्मचारी असल्याचेही दिसते. ही घटना घडत असताना पोलिसाने त्या व्यक्तिच्या हातातील मुलगा हिसकावून घेतला आणि बाल कल्याण समितीकडे सोपवला. पण, या घटनेत आरोपी मात्र फरार झाला.
सांगितले जात आहे की, दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात अत्यंत घृणास्पद पाऊल टाकत त्याने ३ वर्षाच्या मुलावरच सगळा राग काढला. त्या व्यक्तिने मुलाला उचलून कडेवर घेतले आणि अचानकपणे ऑटोरिक्षाच्या समोरच्या भागावर आपटले. धक्कादायक म्हणजे या व्यक्तिने हा प्रकार पोलिसाच्या समोरच केला.
#WATCH Man in an inebriated state bangs his 3-yr-old son against an auto-rickshaw following a quarrel with his wife. Child handed over to Child Welfare Committee. Case registered under Sec 324 of IPC & Sec 75 of the Juvenile Justice Act; Accused absconding (9.07.18) #Hyderabad pic.twitter.com/8YWjfrEdjN
— ANI (@ANI) July 10, 2018
दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तिच्या हातातून मुलाला हिसकाऊन घेतले. पण, त्यात पोलीस आणि ती व्यक्ती यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलिसांनी मुलाला बालकल्याण आयोगाकडे सोपवले आहे. तसेच, भा.दं.सं. कलम ३२४ अन्वये आणि बाल न्याय कायदा (मुलांची काळजी व संरक्षण) कलम ७५ अन्वये सदर व्यक्तिवर गुन्हा दाखल केला. आरोपी पसार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.