Doctor's Strike on 17 Aug: कोलकत्ता येथील प्रशिक्षित डॉक्टरवर बलात्कार करुन हत्येप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून डॉक्टरांचे आंदोलन सुरू होते. आता या लढ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने गुरुवार 15 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 17 ऑगस्ट रोजी 24 तासांसाठी सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
IMA च्या म्हणण्यानुसार, ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी डॉक्टरांसोबत केलेल्या वर्तवणुकीविरोधात 17 ऑगस्ट रोजी सर्व डॉक्टर संपावर जाणार आहे. डॉक्टरांच्या या निर्णयाचा परिणाम वैद्यकीय सेवांवर होणार आहे. आयएमएकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, मॉर्डन मेडिसनचे डॉक्टर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्टच्या सकाळी 6 पर्यंत संपावर जाणार आहेत. डॉक्टरांच्या संपकाळात रुग्णांना फक्त इरमजन्सी सेवाच देण्यात येणार आहे.
दरम्यान, आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयाचील प्रशिक्षक डॉक्टरांनी आरोप केला आहे की, रुग्णालय प्रशासनावर पुराव्यांसोबत छेडछेड करत आहेत. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानुसार, सेमिनार हॉलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. आरजीकर हॉस्पिटलमध्ये बुधवारी मध्यरात्री हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. आंदोलनाच्या नावाखाली 40-50 लोकांच्या एका समुहाने बुधवारी मध्यरात्री रुग्णालयाच्या परिसरात घुसून तोडफोड केली. यामुळं परिस्थिती थोडी चिघळली आहे. पोलिसांनी हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला आणि लाठीचार्जदेखील केला. या हिंसक घटनेने रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरले होते.
कोलकत्ता आरजीकर मेडिकल विद्यालयाच्या तोडफोडप्रकरणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांनी 12 आरोपींन अटक केली आहे. या आरोपींना 22 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने आरजी कर मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या सुरहिता पॉल यांची तासभर चौकशी केली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी संबंधित व्यक्तींचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.