IIT, IIM नव्हे 'हा' कोर्स करून मिळवले 1 कोटीचे पॅकेज, आता अमेरिकेत जाणार!

BTech College With High Salary Placement: भारतातील एका विद्यार्थ्याला न्यूजर्सीयेथील एका आघाडीच्या कंपनीत 1 कोटींचे पॅकेज मिळाले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे भरभरुन कौतुक केले जात आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 5, 2024, 06:12 PM IST
IIT, IIM नव्हे 'हा' कोर्स करून मिळवले 1 कोटीचे पॅकेज, आता अमेरिकेत जाणार! title=
Iiit allahabad placement rushil patra got highest package of 1 crore

BTech College With High Salary Placement: भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान, अलाहाबाद येथून बीटेक आयटीचे शिक्षण घेतलेला रुशिल पात्रा याने यशाला गवसणी घातली आहे. रुशिलला अमेरिकेतील रोजलँड न्यूजर्सी येथील कंपनी एडीपी येथे एक कोटींहून अधिक वार्षिक पॅकेजसोबत प्लेसमेंट मिळाली आहे. या वर्षात एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेले हे सर्वोत्तम पॅकेज असल्याचे, संस्थेने म्हटलं आहे. रुशिल वर्तमान याने आयआयआयटीतून बी.टेक आयटीच्या शेवटच्या वर्षांत शिकत आहे. एडीपीसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवणे हे खूपच आव्हानात्मक असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. 

रुशिलने म्हटलं आहे की,  मी एडीपी कंपनीच्या मुख्यालयात 10 आठवड्यांसाठी इंटर्नशिप केली होती. ही एक ऑन-साइट इंटर्नशिप केली होती. इंटर्नशिप पूर्ण होताच मला तिथे अॅप्लिकेशन डेव्हलपर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. माझा वर्षाचा पगार जवळपास 1 कोटीहून अधिक आहे.

रुशीलने पुढे म्हटलं आहे की, तो आयआयआयटीच्या क्रिकेट टीममध्येदेखील मी आहे. मला स्टार्ट-अप्सची खूप आवड आहे. मला नवीन तंत्रज्ञानाबद्दल वाचायला आवडते आणि समाजासाठी परिणामकारक करायची इच्छा आहे. मी मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग वापरून आरोग्य सेवा उद्योगातील समस्या सोडवण्यावर काम करत आहे. मशीन लर्निंगच्या ऍप्लिकेशनवर काम करायचे आहे आणि लोकांना भारतात गुंतवणूक करण्याचा मार्ग बदलू शकेल असे काहीतरी तयार करायचे आहे, असंही त्याने म्हटलं आहे. 

एडीपी क्लाउड ही एक क्लाउड आधारित ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी असून जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. एडीपी कंपनीचा नावीन्यपूर्ण आणि उत्‍कृष्‍टतेसाठी नावलौकिक आहे. 70 वर्षांहून अधिक अनुभवासह, ADP वर जगभरातील व्यवसायांद्वारे पेरोल, मानव संसाधन व्यवस्थापन, फायदे प्रशासन आणि बरेच काही यामधील कौशल्यासाठी विश्वास ठेवला जातो. कंपनीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळं ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यामुळं जगातील आघाडीच्या कंपनीत स्थान मिळाल्यामुळं आयआयआयटी-एचे संचालक प्रोफेसर मुकुल शरद सुतावणे यांनी रुशीलचे अभिनंदन केले आहे.