राजकुमार रावच्या विनोदाला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 21, 2017, 05:31 PM IST
राजकुमार रावच्या विनोदाला स्मृती इराणींचं जोरदार प्रत्युत्तर title=

पणजी : ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. गोव्याची राजधानी पणजीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन सोमवारी करण्यात आलं. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री राधिका आपटे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं.

या कार्यक्रमादरम्यान अभिनेता राजकुमार राव यांनी स्मृती इराणींवर विनोद केला. इराणी दिग्दर्शक माजिद मजीदीबद्दल बोलताना राजकुमारनं स्मृती इराणींना चिमटा काढला. मजीदी इराणी आहेत आणि आमच्या मंत्रीही इराणी आहेत. यानंतर स्मृती इराणींनीही याच कार्यक्रमात राजकुमार रावला प्रत्युत्तर दिलं.

राजकुमार रावनं हा विनोद एका मंत्र्यावर केला आहे. सरकार म्हणून आम्ही किती सहिष्णू आहोत हे यातून सिद्ध होतं, असं स्मृती इराणी म्हणाल्या. भाजप नेत्याला असं म्हणल्यामुळे त्याचा पाय तुटला असं तरी कोणी म्हणणार नाही, असा टोलाही इराणींनी लगावला. काही दिवसांपूर्वी शूटिंग करत असताना राजकुमार रावचा पाय तुटला होता. त्यावरून इराणींनी हे वक्तव्य केलं.