नवी मुंबई : ‘काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’(सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल जाहीर होणार आहे. शुक्रवारी दुपारी ३.०० वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. डिजीलॉकरच्या मदतीने विद्यार्थ्यांना गुणपत्रक देखील घेता येणार आहे. शिवाय निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ पुनर्मुल्यांकनासाठी अर्जही करता येणार आहे. प्रत्येक पेपरच्या पुनर्मुल्यांकनासाठी विद्यार्थ्यांकडून १ हजार रूपये आकारले जाणार आहे.
विद्यार्थी आयोगाच्या www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. संकेतस्थळाशिवाय विद्यार्थी एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना आईसीएसई (रोल नंबर) टाइप करून 09248082883 एसएमएस करावा लागेल.
कसा पाहाल निकाल
- www.cisce.org या संकेतस्थळावर जा.
- आवश्यकतेनुसार ICSE किंवा ISC ची निवड करा.
- यूआयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा निट भरा.
- त्यानंतर Show Result वर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा निकाल दिसेल