मुंबई : बिहारमध्ये गुन्हेगारी घटनांवरुन विरोधक सातत्याने नितीश सरकारला घेरत आहेत. मात्र गुन्हेगारी घटना कमी होत नाहीत. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरात चोरट्यांनी सोमवारी दिवसाढवळ्या ICICI बँकेवर दरोड टाकत सुमारे 14 लाख रुपये लुटले आहेत. (loot icici bank)
पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, तीन सशस्त्र गुन्हेगार सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गोबरशाही येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत घुसले आणि शस्त्राच्या जोरावर कॅश काउंटरमध्ये ठेवलेले पैसे लुटले. यावेळी दरोडेखोरांनी अनेक ग्राहकांचे पैसेही लुटून पळ काढला. सर्व दरोडेखोरांनी मास्क घातले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी बँकेत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने तपास सुरु केला आहे.
शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे शहर पोलीस निरीक्षक सत्येंद्र मिश्रा यांनी सांगितले. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्याआधारे दरोडेखोरांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.