IAS Tina Dabi यांचा 'या' IAS अधिकारीने मोडला रेकॉर्ड, जाणून घ्या प्रेरणादायी कहाणी...

IAS Ansar Shaikh: तो वयाच्या 21 व्या वर्षी IAS बनून देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी बनला आहे.  

Updated: Oct 1, 2022, 05:38 PM IST
 IAS Tina Dabi यांचा 'या'  IAS अधिकारीने मोडला रेकॉर्ड, जाणून घ्या प्रेरणादायी कहाणी... title=
IAS Tina Dabi and IAS Ansar Shaikh broke the record nm

UPSC Exam: तुम्हा आम्हाला IAS टीना दाबी (IAS Tina Dabi ) यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे.  पण आज आपण अशा एका IAS अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी इतिहास रचला आहे. जर तुमचं ध्येय पक्कं असेल आणि खरी श्रद्धा-निष्ठा-जिद्द असेल तर आपण कुठलंही यश सहज मिळवू शकतो. अन्सार शेख असेच एक UPSC इच्छुक आहे ज्याने ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण करण्यात यश मिळवले आणि यासह तो वयाच्या 21 व्या वर्षी IAS बनून देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी बनला. (IAS Tina Dabi and IAS Ansar Shaikh broke the record nm)

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

अन्सारी शेख (Ansar Shaikh) यांच्या यशामुळे महाराष्ट्राच्या (Maharashtra) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अन्सारी शेख हा जालना (Jalna) जिल्ह्यातील शेलगाव या गावचा आहे. अन्सारने आपल्या परीक्षेत ऑल इंडिया रँक 361 मिळवला आणि याद्वारे तो देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी बनला. आयएएस अधिकारी टीना दाबी यांनी वयाच्या  22 व्या वर्षी यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली होती. टीना दाबी या तिच्या बॅचमध्ये टॉप झाल्या होत्या आणि त्या सध्या जैसलमेर (Jaisalmer) जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

वडील ऑटो रिक्षा चालवायचे

अन्सार हा देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी आहे. तर त्यांचे वडील योनास शेख अहमद एक ऑटोरिक्षा चालक (Autorickshaw driver) आहेत. अतिशय कठीण परिस्थित अन्सारी यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अन्सारी यांचा भावाने सातव्या वर्गातच शाळा सोडून दिली. कुटुंबाच्या मदतीसाठी भाऊ गॅरेजमध्ये काम करतात. विशेष म्हणजे अन्सार यांना यूपीएससी परीक्षेसाठी त्यांचा भावाने मदत केली. 

अन्सारने वयाच्या 21 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेतील त्याचा हा पहिलाच प्रयत्न उत्तीर्ण होऊन, ते देशातील सर्वात तरुण UPSC उमेदवार बनले.