मुंबई : बलात्कार आणि हत्ये प्रकरणात पोलीस आरोपिचा शोध घेण्यात व्यस्थ होती. ज्या मुलीचा मृतदेह समजून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच मुलीचा 'मी जिवंत आहे' असं म्हणत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या मुलीने स्वतः आपण जिवंत असल्याचं सांगत एक व्हिडिओ शेअर केला आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील घटना.
वैशाली जिल्ह्यातील रहिमापुर येथे २२ ऑगस्ट रोजी बारकपुर येथे राहणाऱ्या वडिलांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह सापडला. बलात्कार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस झाला. मृतदेहाची ओळख पुसून टाकण्यासाठी चेहऱ्यावर ऍसिड फेकण्यात आलं होतं.
मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हत्येचा तपास सुरू केला. अपहरण आणि हत्या असा तपास सुरू झाला. पण या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला. ज्यामुळे स्वतः मेनका,'मी जिवंत आहे.' असं सांगत होती.
पोलिसांनी ज्या मृतदेहाचं मेनका समजून पोस्टमार्टम केलं. कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले तो मृतेदह नेमका कुणाचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंत्यसंस्काराच्या १० दिवसांनी मेनका समोर आली आहे.
मेनकाने शेअर केलेल्या व्हिडिओत स्पष्ट म्हटलंय की,'मी जिवंत आहे. माझ्या मनाने मी घरातून पळून लग्न केलं आहे. माझ्या वडिलांनी आणि कुटुंबियांनी या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे. कुटुंबियांनी मी फोन करून सांगितले तरीही त्यांनी हा गुन्हा दाखल केला आणि माझ्यावर अंत्यसंस्कार केले असं दाखवलं.'