भुकेने व्याकूळ झालेल्या बकरीने चावून खाल्ले ६६ हजार रुपये

भुकेनं व्याकूळ झालेल्या बकरीने मालकाचे तब्बल ६६ हजार रुपये चावून खाल्ल्याची घटना कानपूरच्या कन्नौज जिल्ह्यातील एका गावात घडलीये.

Updated: Jun 7, 2017, 12:13 PM IST
भुकेने व्याकूळ झालेल्या बकरीने चावून खाल्ले ६६ हजार रुपये title=

कानपूर : भुकेनं व्याकूळ झालेल्या बकरीने मालकाचे तब्बल ६६ हजार रुपये चावून खाल्ल्याची घटना कानपूरच्या कन्नौज जिल्ह्यातील एका गावात घडलीये.

सर्वेश कुमार या शेतकऱ्याच्या बकरीने हे केलंय. २ हजार रुपयांच्या ३१ नोटा त्याच्या खिशात होत्या. सर्वेश कुमार आंघोळीसाठी गेला असताना बकरीने खिशातील नोटा चावण्यास सुरुवात केली. 

हा प्रकार पाहून त्याने बकरीच्या तोंडातून नोटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ३३ नोटांपैकी केवळ २ नोटा तो वाचवू शकला. दरम्यान, आपल्या घरासाठीचे सामान खरेदी करण्यासाठी त्याने हे पैसे जमवले होते.