How to Dye Jeans Black: काळ्या रंगाची जिन्स सतत धुवून धुवून जुनी वाटायला लागते. कधी कधी रंगही फिका पडतो. अशावेळी एकतर ती जिन्स फेकून द्यावी लागते किंवा घराबाहेर कोणत्या कार्यक्रमासाठी जाताना ती जिन्स घालून घराबाहेर पडू शकत नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरीच काही उपाय वापरुन काळ्या रंगाच्या जिन्सची चमक पुन्हा आणू शकता. काळी जिन्स सतत धुण्यामुळं किंवा कडक उन्हात सुकत घातल्यामुळं जिन्सचा कलर फिका पडतो. अशावेळी काय करावं यासाठी या टिप्स जाणून घ्या.
काळ्या रंगाची जिन्स सतत वापरुन वापरुनही रंग फिका पडतो. ती जिन्स विटल्यासारखी वाटते. बाहेर जाताना अशी जिन्स घालून जाणे बरोबर वाटत नाही. यासाठीच आम्ही आज तुमच्यासाठी सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. यावापरुन तुम्ही अर्ध्या तासात फिका झालेल्या जिन्सचा रंग पुन्हा नव्यासारखा मिळवू शकणार आहात.
ब्लॅक डाय कलर
रबर ग्लोव्ह्स
एक टब
मीठ
वुडन स्पून
लिक्विड डिटर्जेंट
सगळ्यात पहिले टपात गरम पाणी टाका. पण एक लक्षात घ्या की हे पाणी उकळते नसावे. त्यानंतर यात डाय कलर आणि अर्ध्या चमचा मीठ टाकून चांगलं मिश्रण करुन घ्या.
आता टपात तयार केलेल्या मिश्रणात तुमची जिन्स टाकून ठेवा. त्यानंतर वुडन स्पूनने जिन्स चांगली घोळवून घ्या. जेणेकरुन कलर संपूर्ण जिन्सला लागेल. या मिश्रणात जवळपास 30 मिनिटांसाठी जिन्स ठेवून द्या. 30 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर जिन्स धुवून व्यवस्थित पिळून काढा. लक्षात ठेवा की या काळात तुम्ही तुमच्या हातात रबरचे हातमोजे घातले आहेत. अन्यथा, काळा रंग तुमच्या हातावर येऊ शकतो.
डाय केल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप असते ती म्हणजे थंड पाण्याने जीन्स धुणे. त्यासाठी तुम्हाला एका टपात थंड पाणी घ्यायचे आहे आणि त्यात डिटर्जेंटमध्ये जिन्स टाकून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जिन्स स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती व्यवस्थित पिळून घ्या. अतिरिक्त पाणी काढून टाकल्यानंतर सुकवण्यासाठी ठेवून दे. पण एक लक्षात घ्या की जिन्स उन्हात सुकवू नका.