मुंबई : कोरोना लसीबद्दल 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. लस घेण्यासाठी त्यांना कोणतीही खटपट करण्याची आता गरज नाही कारण आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, आता 18 ते 44 वयोगटातील लोकं ऑनलाईन रजिस्ट्रेशन शिवाय कोणत्याही सरकारी लसीकरण केंद्राला भेट देऊ लस घेऊ शकतात. याची सुरूवात 24 मे पासून झाली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे तरुणांचे मोठे टेन्शन कमी झाले आहे.
केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील तिसर्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम १ मेपासून सुरू केला. परंतु 45+ वयोगटातील लोकांप्रमाणे त्यांच्याकडे स्पॉट नोंदणीची सुविधा नव्हती. अशा लोकांना कोविन पोर्टल, आरोग्य सेतु अॅप किंवा उमंग अॅपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर त्यांना जो दिवस दिला जाईल त्या दिवशी लसीकरण केंद्रात जाऊन लस मिळत असत.
जेव्हा बहुतेक तरूण त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्राला बुक करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांचा स्लॉट बुक दाखवला जायचा किंवा तो स्लॉट अजिबात दिसत नसायचा. लसीच्या अभावामुळे हे होत असत्याचे नंतर समोर आले आहे.
On-site registration & appointment is now being enabled for the 18-44 years age group on CoWIN. However, this feature is being enabled only for Government #COVID Vaccination Centers (CVCs), at the present moment in time: Union Ministry of Health and Family Welfare
— ANI (@ANI) May 24, 2021
45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांप्रमाणे आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना देखील स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला फार कष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट किंवा रेशन कार्ड सोबत आणावे लागेल आणि त्याची कॉपीसुद्धा ठेवावी लागेल.
यासह, तुमचा मोबाईल देखील तुम्हाला हातात ठेवावा लागेल कारण, तुमच्या मोबाईल नंबरची आवश्यकता स्पॉट नोंदणीच्या वेळी लागते. त्यावर तुम्हाला संबंधित मॅसेज मिळणार. केवळ लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारीच तुमची नोंदणी करतील आणि उपलब्धतेनुसार ही लस देतील.
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट
पेन्शन कागदपत्र
आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
पॅन कार्ड
बँक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेला पासबुक
Central केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक क्षेत्र मर्यादित कंपन्यांनी जारी केलेले आयकार्ड
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आता 18 ते 44 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. ज्यांनी आधीच नोंदणी केली असेल, तरी तुम्हाला लसीकरण केंद्रावरच नोंदणी करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला अपॉईन्टमेंट आणि लस मिळेल. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, ऑनलाईन नेमणुकीच्या वेळी बर्याच ठिकाणी लसी वाया गेल्याच्या बातम्या समोर आल्या कारणाने हा निर्णय घेतला गेला आहे.
आरोग्य सेवा मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही सुविधा सध्या केवळ शासकीय लसीकरण केंद्रात उपलब्ध आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या नवीन प्रणालीविषयी माहिती देण्यात आली आहे.
राज्यांच्या निर्णयानंतर तिथे ऑनसाईट किंवा ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन आणि नियुक्तीची सुविधा उपलब्ध होईल. म्हणजे अंतिम निर्णय हा राज्य सरकारच्याच हातात आहे.