पॅनकार्ड बनवण्याचं टेन्शन संपलं! आता 110 रुपयांत थेट घरी पोहोचणार कार्ड, कसं ते जाणून घ्या

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड बनवणे किंवा दुरुस्त करणे या दोन्ही गोष्टी सहज करता येतात. आज आम्ही तुम्हाला या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत.

Updated: Jul 20, 2022, 06:33 PM IST
पॅनकार्ड बनवण्याचं टेन्शन संपलं! आता 110 रुपयांत थेट घरी पोहोचणार कार्ड, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : पॅन कार्ड ही आता प्रत्येकाची गरज बनली आहे. आयकर किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. एवढंच काय तर नोकरीच्या ठिकाणी देखील आपल्याला पॅनकार्ड गरजेचं वाटतो. परंतु असे असले तरी अनेक असे लोक आहेत. ज्यांनी अजूनही पॅन कार्ड बनवलेलं नाही. म्हणून आज आम्ही अशा लोकांना ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. त्या प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर तुम्हीही सहजपणे पॅन कार्ड बनवू शकता, चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड बनवणे किंवा दुरुस्त करणे या दोन्ही गोष्टी सहज करता येतात. आज आम्ही तुम्हाला या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. विशेष म्हणजे पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ऑनलाइन पॅन कार्ड NSDL

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ९३ रुपये (जीएसटीशिवाय) भरावे लागतील. आम्ही तुम्हाला सांगतो की ही फी भारतीय नागरिकांसाठी आहे, जर एखाद्या परदेशी नागरिकाला पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला 864 रुपये (जीएसटी शिवाय) फी भरावी लागेल. ऑनलाइन शुल्क क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे भरता येते.

यासोबतच तुम्ही नेट बँकिंग किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे फी देखील भरू शकता. जर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज केला असेल, तर सर्व कागदपत्रे NSDL/UTITSL कार्यालयात जावे लागतील.

कागदपत्रे पाठवणे देखील आवश्यक आहे

पॅन कार्ड अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची यादी तुमच्या समोर येईल. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, अर्ज भरल्यानंतर कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. जर तुम्ही कागदपत्रे पाठवली नाहीत तर अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाणार नाही. अर्ज अंतिम टप्प्यात नेण्यासाठी सर्व कागदपत्रांची छायाप्रत पाठवणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 10 दिवसात पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचेल.