तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?

New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता. 

Updated: Apr 5, 2023, 02:23 PM IST
तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?  title=

New Wage Code 2022: नोकरी लागल्यानंतर आपल्या पगारातून आपल्याला बेसिक सॅलरी (Basic Salary) किती मिळणार आहे? त्याचसोबत त्यातून आपल्याला इतर फंड (Funds in Salary) कसे मिळतील व त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याकडेही आपल्याला लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तेव्हा जर का तुमची बेसिक सॅलरी 25,000 रूपये प्रति महिना (Basic Salary Per Month) इतकी असेल तर त्यावर तुम्हाला कोणते फंड्स मिळतील आणि त्याचा तुम्हाला फायदा कसा होईल हे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.

प्रत्येक कंपनी ही त्यांच्या नोकरदारांना सीटीसी (ctc) देते. ज्यात बेसिक सॅलरीपासून फंड्स, प्रोफेशनल टॅक्स (Professional Tax) आणि बोनस (Bonus) यांचा यात समावेश असतो. (How much funds you will get if your basic salary is 25000 per month know the new wage code business news in marathi)

त्यातून आपले वर्षाचे पॅकेज (Yearly Package) ठरते. बेसिक सॅलरी ही कंपनीवर अवलंबून असते. तेव्हा त्यात तुमचे सगळे फंड्स हे कापले जातात आणि महिन्याला तुम्हाला इनहॅन्ड सॅलरी (In Hand Salary) मिळते. तुमची बेसिक सॅलरी जर का 25,000 रूपये असेल तर तुम्हाला वर्षाला मिळणाऱ्या फंड्समधून (Benefits of 25,000 Rupees Basic Salary) किती आणि कसा फायदा होईल? हे या लेखातून जाणून घेऊया. 

मागच्या वर्षीपासून न्यू वेज कोड (New Wage Code 2022) जाहीर करण्यात आला. त्यात प्रायव्हेट कंपन्यांकडून नोकरदारांना मिळणाऱ्या कॉस्ट टू कंपनी (Cost to Company) म्हणजेच सीटीसीमध्ये इन हॅण्ड सॅलरीपासून प्रोव्हिडंट फंड (PF), एसआयसी (ESIC) आणि ग्रॅज्यूटीचा (Gratuity) पुर्णपणे फायदा घेता येणार आहे. यामध्ये तुमची इन हॅण्ड सॅलरी ही फार कमी असते. त्यातून तुम्हाला फंड्समध्ये जास्त चांगली रक्कम मिळेल. तुम्ही तुमच्या रिटायर्डमेंटपर्यंत (Retirement Plans) तुमचे हे पैसे साठवून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला वयाच्या 60 नंतर त्याचा चांगला फायदा करून घेता येईल. 

किती मिळतील फंड्स? 

तुमची बेसिक सॅलरी जर का 25,000 रूपये असेल तर तुम्हाला रिटायर्टमेंटपर्यंत 1,16,62,366 रूपये एवढी रक्कम मिळेल. 

तुमच्या आत्ताच्या वयापासून ते वय वर्षे 60 पर्यंतचा हिशोब तुम्ही केलात तर 30 वर्षांचा कालावधी आहे. त्यात 5 टक्के अंदाजे पगारवाढीसह 8.5 टक्के ईपीएफ व्याज (EPF Interest Rate) असेल तर तुमचे ईपीएफ कॉन्ट्रिब्यूशन हे 25,47,388 रूपये इतके होईल आणि इन्प्लोयरचे 7,79,076 रूपये इतके असेल. तेव्हा दोन्ही मिळू हे कॉन्ट्रिब्यूशन 33, 26,464 रूपये इतके असेल तेव्हा तुमची मेच्यूरिटी अमांऊट ही 1,16,62,366 इतकी राहील. 

कॉस्ट टू कंपनी म्हणजे काय? 

यामध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी, रीईम्बर्समेंट, भत्ते (Reimbersement) यांचा समावेश असतो. त्यातून व्हेरियबल पे, बोनस, पीएफ, ग्रॅज्यूटी, इन्सेटिव्हज यांचाही समावेश असतो. तुमच्या ग्रॉस सॅलरीसह (Gross Salary) तुम्हाला पीएफ आणि ग्रॅज्यूटीचा फायदा मिळतो. 

बेसिक सॅलरी ही फीक्स असते मग त्यानुसार त्यात इतर कर्मचारी भत्ते आणि एचआरएचा (HRA) समावेश असतो. जी मिळून तुम्हाला ग्रॉस सॅलरी मिळते. नेट सॅलरीमधून (Net Salary) तुमचा टॅक्स आणि एपीएफ कापला जातो. असं करत तुम्हाला इनहॅण्ड सॅलरी मिळते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.)