Bank Account Open: आर्थिक व्यवहार करत असताना बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. बँक अकाउंट नसल्यास मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. काही लोक असेही आहेत. ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत. वेगवेगळ्या कारणांसाठी ही बँक अकाउंट सुरू तर करण्यात येतात मात्र,ही बँक अकाउंट मेन्टेन करणे कठिण जाते. पण भारतात एकापेक्षा अधिक बँक अकाउंट सुरू करु शकतो का? याचे फायदे व नुकसान काय आहेत. जाणून घेऊया.
देशात अनेक प्रकारचे बँक अकाउंट तुम्ही सुरू करु शकता. यात सेव्हिंग बँक अकाउंट, करंट बँक अकाउंट आणि सॅलरी बँक अकाउंट सारखे प्रकारदेखील आहेत. प्रत्येक बँक अकाउंटचे महत्त्व वेगवेगळे आहे. त्यामुळं तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही बँकमध्ये अकाउंट सुरू करु शकता. मात्र, एकापेक्षा अधिक बँक अकाउंट सुरू करावेत की नाही, याविषयी लोकांच्या मनात संशय असतो. याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतात एक व्यक्ती कितीही बँक अकाउंट सुरू करु शकतो. बँक अकाउंट सुरु करण्यासाठी कोणतीही लिमीट नाहीये. तुमच्याकडे किती बँक अकाउंट असावेत याबाबत कोणत्याही बँकेने मर्यादा निश्चित केलेली नाही. मात्र, असा सल्ला दिला जातो की लोकांकडे कमी बँक खाती असावीत कारण अधिक बँक खाती राखणे कठीण होते.
बँकांनी निश्चित केलेली रक्कम म्हणजेच किमान शिल्लक बँक खात्यात असणे आवश्यक आहे. विहित किमान रक्कम बँक खात्यात न ठेवल्यास त्यावर दंडही आकारला जाऊ शकतो. यासोबतच बँकांकडून लोकांवर वेगवेगळे शुल्क आकारले जाते.यामध्ये मोबाईलवरील एसएमएस सुविधा, एटीएम शुल्क आदींचा समावेश आहे. जर बँक खाते वापरले जात नसेल तर हे शुल्क तुमच्या खात्यातून कापले जाईल. अशा परिस्थितीत, एकच बँक खाते ठेवण्याचा सल्ला दिला जातो.