पाय घसरला अन् रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच अडकली मुलगी, पुढे... Video Viral

एक विद्यार्थीनी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये सापडली, हे दृश्य पाहतानाचा अंगावर काटा येतो. 

Updated: Dec 7, 2022, 09:01 PM IST
पाय घसरला अन् रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच अडकली मुलगी, पुढे... Video Viral

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात यामध्ये काही व्हिडीओ असे असताती की विश्वास ठेवणंही कठीण होतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दिसत आहे की, एक विद्यार्थी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये सापडली. हे दृश्य पाहतानाचा अंगावर काटा येतो. सुदैवाने  या विद्यार्थिनीचा जीव वाचला आहे. 

नक्की काय घडलं? 
संबंधित मुलीचं नाव शशिकला असून ती 20 वर्षांची आहे. ती कॉलेजला जाण्यासाठी अण्णावरहून दुव्वाडाला गेली. मात्र गुंटूर-रायगडा एक्सप्रेसमधून पाय घसरला आणि शशिकला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामधल्या भागामध्ये अडकली. अचानक पडल्याने ती घाबरली आणि  मदतीसाठी इतरांना बोलावू लागली, तिला पाहताच आजूबाजूचे लोकलोक लोक जमा झाले. 

 

अधिकारीही आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अडचण अशी झाली होती की तिला हालचालही करता येत नव्हती. परिणामी शेवटी प्लॅटफॉर्मचा काही भाग कट करावा लागला. यासाठी जवळ जवळ दीड तासांचा कालावधी गेला अखेर तिची सुखरूप सुटका करण्यात आली. 

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशाखापट्टणममधील दुव्वाडा इथे ही घटना घडली. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावरीह परिणाम झाला. काही गाड्या लेट झाल्या पण मुलीचा जीव वाचला ते महत्त्वाचं. तुम्हीसुद्धा रेल्वे प्रवास करत असाल तर वेळी काळजी घ्या अन्यथा एका चुकीमुळे तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x