Navratri 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान दाखवतात 'या' माशाचा नैवेद्य, पाहा Heart Disease मध्ये कशी करतो मदत

नवरात्रीदरम्यान मांसाहार? हो... नाकं मुरडण्यापेक्षा पाहा या माशाचे फायदे... 

Updated: Sep 26, 2022, 11:10 AM IST
Navratri 2022 :  नवरात्रोत्सवादरम्यान दाखवतात 'या' माशाचा नैवेद्य, पाहा Heart Disease मध्ये कशी करतो मदत  title=
Hilsa Fish demand raises in Navratri 2022 as it also helps in heart disease read benefits

Navratri 2022 : नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असतानाच आता लगबग सुरु आहे ती म्हणजे देवीची यथासांग पूजा मांडण्याची, तिला प्रसन्न करण्याची. असं म्हणतात की या दिवसांमध्ये सात्विक आहाराचं सेवन करत देवीला नैवेद्य अर्पण करावा. पण, तुम्हाला माहितीये का नवरात्रीदरम्यान देवीला माशांचाही नैवेद्य दाखवतात? हे दिवस असतात दुर्गापूजेचे. बंगाली समुदायाकडून साजरा केल्या जाणाऱ्या दुर्गापूजेदरम्यान देवीला शाकाहारी पदार्थांसोबतच भोग म्हणून माशांपासून तयार केलेले पदार्थही दाखवले जातात. (Durga puja 2022) 

भोग म्हणून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये हिलसा मासा न चुकता समाविष्ट केला जातो. यंदाच्या वर्षी (Bangladesh) बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात हा मासा भारतात आला आहे. ताज्या पाण्यातल्या या माशाची चव अनेकांच्याच सवयीची. पण, त्याचे गुणही तितकेच रामबाण (health benefits of hilsa fish), हृदयरोग असणाऱ्यांसाठी हा मासा मोठ्या मदतीचा (Hilsa fish for heart health).  

अधिक वाचा : Navratri 2022 : नवरात्रोत्सवाच्या पावन दिवसांमध्ये अजिबात नका करू 'ही' घोडचूक; नाहीतर होईल देवीची अवकृपा 

 

हा मासा इलिशा या नावानंही ओळखला जातो. त्यामध्ये फॅटी अॅसिड (Fatty acid), ओमेगा 3 (Omega 3) अशी घटक तत्त्व असतात. ज्याची मदत कोरोनरी हार्ट इशूज़ (Coronary heart issues) दूर ठेवण्यासाठी केली जाते.  (Hilsa Fish demand raises in Navratri 2022 as it also helps in heart disease read benefits)

आरोग्यासाठी हिलसाचे आणखी काही फायदे... 
- प्रचंड प्रमाणात प्रोटीन 
- माशामध्ये असणारं कॅल्शियम हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण 
- हिलसा खाणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका तुलनेनं कमी 
- या माशातून शरीराला विटामिन ए आणि डी अशी तत्वं मिळतात 
- हिलसा मासा तुमची त्वचा सुरेख आणि टवटवीत ठेवण्यासही मदत करतो. इतक्या सर्व गुणांनी परिपूर्ण असल्यामुळंच हिलसा माशांची राणी म्हणूनही प्रसिद्ध आहे.