कोलकाता : दमदम भागात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट मुख्य बाजारातील एका इमारतीत झाला. या स्फोटात 6 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट दम पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी झाला आहे.
फळाच्या दुकानाबाहेर सकाळी 9 वाजता हा स्फोट झाला. या इमारतीत महत्त्वाची कार्यालयं देखील आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार स्फोट हा कशामुळे झाला याची चौकशी अजून सुरु आहे. फॉरेंसिक टीम देखील या ठिकाणी तपास करत आहे.
West Bengal: Police says, "It was a high-intensity blast. 4 people seriously injured, 6 injured. Found some iron nails but can't ascertain cause of blast yet as there is no smell of gunpowder."; Visuals of CID bomb disposal squad at site of explosion in Dum Dum's Nager Bazar area pic.twitter.com/S06xWaGvi7
— ANI (@ANI) October 2, 2018
कोलकाता पोलिसांनी म्हटलं की, घटनास्थळी लोखंडाचे काही कण आढळले आहेत. हा भाग सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आला आहे.