HDFC बँक अलर्ट: 1 एप्रिल रोजी बँकेची ही सुविधा राहणार बंद, पैसे ट्रान्सफर करण्यास अडथळा येणार

HDFC Bank NEFT Transfer: एचडीएफसीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. SMS आणि EMail च्या माध्यमातून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 31, 2024, 03:59 PM IST
HDFC बँक अलर्ट: 1 एप्रिल रोजी बँकेची ही सुविधा राहणार बंद, पैसे ट्रान्सफर करण्यास अडथळा येणार  title=
HDFC Bank customers not avail NEFT money transfer facility on April 1

HDFC Bank Alert: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने त्यांच्या खातेदारांसाठी अलर्ट जारी केले आहे. बँकने खातेधारकांना फोन आणि ईमेलच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलच्या माध्यमातून 1 एप्रिल रोजी बँकेची NEFT ट्रान्सेक्शनची सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. HDFC बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 रोजी एक्सटर्नल एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) व्यवहार सुविधा १ एप्रिल २०२४ रोजी उपलब्ध होणार नाही. आर्थिक वर्ष 2023-24 31 मार्च रोजी संपत आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीशी संबंधित कार्यवाहीमुळे, 1 एप्रिल रोजी NEFT हस्तांतरणास विलंब होऊ शकतो.

एचडीएफसी बँकेत जर तुमचेही खाते आहे तर 1 एप्रिलला  बँकेसंबंधीत व्यवहार करताना तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी  NEFT सेवा बंद राहणार आहेत किंवा अडथळे येऊ शकतात. बँकेने म्हटलं आहे की, आर्थिक वर्ष संपल्यामुळं त्यासंबंधी प्रक्रियांसाठी  NEFT ट्रान्सक्शेन सुविधेत अडथळा येऊ शकतो. 

1 एप्रिलला पगार येण्यास अडथळा?

एचडीएफसीमध्ये जर तुमचे सॅलरी अकाउंट आहे तर एक एप्रिलला तुमचा पगार होण्याची शक्यता कमी आहे. एनएफईटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यास विलंब किंवा अडथळा येऊ शकतो. फक्त इतकंच नव्हे तर, तुमचा पगार एचडीएफसी बँकेत येत असेल तर त्यालाही विलंब होऊ शकतो. तुम्हाला 1 एप्रिल रोजी NEFT हस्तांतरणाद्वारे पगार किंवा इतर देयके मिळाल्यास, त्यातही विलंब होऊ शकतो. अशावेळी बँकेने ग्राहकांना NEFT ऐवजी IMPS, RTGS आणि UPIद्वारे रक्कम पाठवू शकता. तसंच, तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री क्रमांकाशी १८०० १६००/१८०० २६०० वर संपर्क साधू शकता. 

1 एप्रिलला बँक बंद 

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी काही बँकाना सुट्टी असू शकते. आरबीआयच्या गाइडलाइननुसार, इअर अकाउंट्स क्लोजिंगसंबंधीत काम असल्याने काही राज्यांमध्ये बँक बंद ठेवण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या नोटिफिकेशननुसार, मिझोराम, चंदीगढ, सिक्किम, बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय ही राज्ये वगळता देशातील बाकीच्या राज्यात बँक बंद असणार आहेत. तर, 1 एप्रिल रोजी आरबीआयच्या कार्यालयात जाऊन 2000 रुपयांची नोटदेखील बदलण्यात येणार नाहीये.