बॅंकेने असं काय केलं की 100 ग्राहक क्षणार्धात बनले श्रीमंत

तुमच्या बॅंक खात्यात तुम्ही डिपाझिट न करता मोठी रक्कम आली तर, नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

Updated: May 30, 2022, 09:51 PM IST
बॅंकेने असं काय केलं की 100 ग्राहक क्षणार्धात बनले श्रीमंत  title=

मुंबई : तुमच्या बॅंक खात्यात तुम्ही डिपाझिट न करता मोठी रक्कम आली तर, नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. मात्र या घटनेत असाच धक्का 100 बॅंक ग्राहकांना एकाचवेळी बसलाय. या मागचे कारण म्हणजे प्रत्येक ग्राहकांच्या खात्यात 13 कोटी जमा झालेत, याचाच अर्थ एकूण 1300 कोटी या ग्राहकांच्या खात्यात जमा झाले होते. या घटनेने हे सर्व ग्राहक वेडेपिसे झाले होते. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. 

तामिळनाडूच्या टी. नगर, चेन्नई येथील एचडीएफसी बँकेतील 100 ग्राहकांच्या खात्यात प्रत्येकी 13 कोटी रुपये जमा झाले होते. या संबंधित मेसेज या सर्व 100 ग्राहकांना आला होता. त्यामुळे या घटनेने सर्वच ग्राहत एकाचवेळी मालामास झाले होते. यात अनेक ग्राहक आनंदात होते तर काहींना आपले खाते हॅक झाल्याची भीती होती. 

दरम्यान या खातेधारकांमधील एकाने आपले खाते हॅक झाल्याची भीतीने स्थानिक पोलिस ठाणे गाठले होते. बॅक ग्राहकाच्या या तक्रारीवरून पोलिसांनी बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चौकशी केली असता, शाखेत सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अनेक ग्राहकांना खात्यात 13 कोटी जमा झाल्याचे मेसेज आले होते. 

बँकेचे स्पष्टीकरण
 बॅंकेतील काही तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. मात्र खात्यांमध्ये कोणतेही हॅकिंग झाले नाही. तसेच ग्राहकांच्या खात्यात13 कोटी रुपये जमा झाले नाहीत. फक्त 13 कोटी रुपये खात्यात जमा झाल्याचा मेसेज 100 ग्राहकांना फॉरवर्ड झाल्याचे स्पष्टीकरण एचडीएफसी बँकेने दिले आहेत.