या माकडाची स्वारी पाहिली का? चक्क या भल्या मोठ्या प्राण्यावर बसून केली...

तो व्हिडिओ तुम्हाला ही खूप हसवेल याची खात्री आहे आम्हाला. 

Updated: Oct 11, 2022, 05:41 PM IST
या माकडाची स्वारी पाहिली का? चक्क या भल्या मोठ्या प्राण्यावर बसून केली... title=
Have you seen this monkey ride Actually this was done sitting on a big animal nz

Viral Video : प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ (Animal Funny Video) अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसतात. आम्हाला ट्विटरवर (Twitter) असाच एक व्हिडिओ सापडला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला ही खूप हसवेल याची खात्री आहे आम्हाला. व्हिडिओमध्ये एक माकड (Monkey) हरणाच्या (deer) पाठीवर बसून  फिरताना दिसत आहे.

आणखी वाचा - कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

 

ट्विटर युजरने व्हिडिओ शेअर (Share) करत लिहिले की, हे IIT मद्रासमध्ये घडले आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे अजूनही कळू शकलेले नाही. हा व्हिडिओ 58 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. (Have you seen this monkey ride Actually this was done sitting on a big animal nz)

व्हायरल (Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड हरणाच्या पाठीवर बसून  फिरताना दिसत आहे. पाठीवर माकड घेऊन हरीण मोकळेपणाने फिरताना दिसते. आजूबाजूला घरे दिसत असल्यामुळे तिथे वस्ती असल्याचे सांगितले जात आहे. 

आणखी वाचा - Amazon Great Indian Festival 2022: बनारसी साडीत खुलवा स्वत:चं सौंदर्य; मौनी रॉय, चिंत्रांगदाचा लूक सहजपणे करा रिक्रिएट

 

व्हिडिओवर कमेंट्सचा (Comments) वर्षाव सुरु झाला होता. एका यूजरने लिहिले की, मजनू भाईला त्यांच्या नवीन पेंटिंगसाठी प्रेरणा. दुसर्‍याने लिहिले, राईडचा आनंद घ्या. लोकांना हा व्हिडिओ एवढा आवडला आहे की ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतरही काही लोकांना आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.