मुलाकडे 30 कोटींची संपत्ती, नातू IAS पण आजी-आजोबा राहात होते उपाशी... डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट

हरियाणा कॅडर ट्रेनी आयएएस विविक आर्य यांच्या आजी-आजोबांनी एक पत्र लिहित आत्महत्या केली. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पत्रातला मजकूर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.

Updated: Mar 31, 2023, 02:58 PM IST
मुलाकडे 30 कोटींची संपत्ती, नातू IAS पण आजी-आजोबा राहात होते उपाशी... डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट title=

Imotional Story : मुलगा करोडपती, नातू आयएएस अधिकारी पण आजी-आजोबांना (Grandparents) दोनवेळचं जेवणही मिळत नव्हतं. अखेर या वृद्ध आजी-आजोबांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी या वृद्ध दाम्पत्याने एक पत्र लिहिलं असून हे पत्र व्हायरल (Suicide Note) झालं आहे. डोळ्यात पाणी आणण्याऱ्या या घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केलं आहे. हरियाणात ही घटना समोर आली आहे. 78 वर्षांचे जगदीश चंद्र आर्य आणि 77 वर्षांच्या भागली देव यांनी सल्फास गोळ्या खात आत्महत्या केली. मृत वृद्ध दाम्पत्य आयएएस विवेक आर्य (IAS Vivek Arya) यांचे आजी-आजोबा आहेत. तर विवेकच्या वडीलांचं नाव वीरेंद्र आर्य असं आहे. हरियाणातल्या चरखी-दादरीमधल्या बाढडा इथली ही घटना आहे. 

काय आहे त्या पत्रात?
मृत वृद्ध दाम्पत्याने लिहिलेलं पत्र भावूक करणारं आहे. यात त्यांनी म्हटलंय 'मी जगदीश चंद्र आर्य माझं दु:ख तुम्हाला ऐकवणार आहे. माझा मुलगा वीरेंद्रकडे 30 कोटींची संपत्ती आहे. पण त्याला त्याच्याकडे आम्हाला दोनवेळचं जेवण देण्यासाठी पैसे नाहीत. मी माझ्या लहान मुलाकडे राहात होतो. पण सहा वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने वाईट काम करायला सुरुवात केली. त्याला विरोध केला असता तीने मारहाण करुन आम्हाला घराबाहेर काढलं' अस जगदीश आर्य यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

पोलिसांना मिळाली माहिती
हे पत्र लिहिल्यानंतर जगदीश चंद्र आणि भागली देवी यांनी विषारी गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. पोलिसांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, त्या दरम्यान जगदीश चंद्र लिहिलेलं पत्र पोलिसांच्या हाती सोपवलं. रुग्णालयात उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

शेजारी देत होते शिळं अन्न
जगदीश चंद्र आर्य यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिलं, घरातून बाहेर काढल्यानंतर दोन वर्ष आम्ही अनाथ आश्रममध्ये राहात होतो. पुन्हा आलो तर मुलाच्या घराला टाळं लागलं होतं. या दरम्यान पत्नीला पॅरेलिससचा झटका आला. त्यानंतर आम्ही मोठ्या मुलाकडे राहु लागलो. पण त्यानेही आम्हाला ठेवण्यास नकार दिला. शेजारचे जेवण देत होते, पण ते शिळं अन्न होतं. किती दिवस हे असं जगयाचं त्यामुळे अखेर आम्ही विषारी गोळ्या खाऊन जीवन संपवत आहोत. आम्हाला दोन सुना, एक मुलगा आणि एक भाचा आहे. जितके अत्याच्यार त्यांनी आमच्यावर केले आहेत, तितके कोणीही आपल्या आई-वडीलांवर करु नका असं आवाहनही त्यांनी या पत्रात केलं आहे. 

आर्य समाजाला संपत्ती दान
सरकार आणि समाजाने या चार जणांना कठोर शिक्षा द्यावी, तेव्हाच आमच्या आत्माल्या शांती मिळेल, असंही या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. बँकत असलेली एफडी आणि बाढडा इथलं दुकान आर्य समाजाला दान करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुलगा वीरेंद्र यांना आजारी असल्याने आई-वडीलांना टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. पण पोलिसांनी दोन्ही सूना, मुलगा आणि भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. 

देशभरात अशीच परिस्थिती
देशभरात साधारण अशीच परिस्थिती असल्याचं एका अहवालात नमुद करण्यात आलं आहे. वृद्धपकाळ, पैशांची कमतरता, कमी पेन्शन आणि कुटुंबांचं दुर्लक्ष यामुळे देशात जवळपास 750 वृद्धाश्रम आहेत. यातले काही खासगी तर काही सरकारी आहेत.