अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतील आपली राजकीय भूमिका हार्दीक पटेल आज जाहीर करणार आहेत. पहिली आणि शेवटची मागणी आरक्षणच असणार आहे.
राजकोटमधून हार्दिक पटेल सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती पास म्हणजेच पटेल अनामत आंदोलन समितीचे नेते दिनेश बांभनिया यांनी दिली. दुसरीकडे काँग्रेसनेही पास बरोबर कुठलेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अनेक मुद्यांवर पास बरोबर सहमती झाल्याचा दावा गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारतसिंग सोलंकी यांनी केला आहे. पासने कोणतीही तिकीट मागितलं नाही.
अल्पेश ठाकून किंवा जिग्नेश मेवानी यांनीही निवडणुकीत तिकीट मागितलं नाही, असं सोलंकी यांनी स्पष्ट केलं आहे. अहमदाबाद मध्ये काँग्रेस आणि पास नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सोलंकी बोलत होते.