हार्दिक पटेल चढला लग्नाच्या बोहल्यावर

एका मंदिरात सामान्य पद्धतीत दोघांनी लग्न केले. 

Updated: Jan 27, 2019, 05:02 PM IST
हार्दिक पटेल चढला लग्नाच्या बोहल्यावर title=

नवी दिल्ली: पाटीदार समाजासाठी ठोस भूमिका घेणाऱ्या त्याप्रमाणे समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारा गुजरातचा नेता हार्दिक पटेल विवाह बंधणात अडकला. त्याची लहानपणीची मैत्रिण किंजल पारिख सोबत हार्दिक लग्न बेढीत अडकला. रविवारी गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार गावात हा विवाह सोहळा संपन्न झाला. एका मंदिरात सामान्य पद्धतीत दोघांनी लग्न केले. उधवा येथील उमिया धाम येथे हार्दिकचे लग्न व्हावे अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. पाटीदारांच्या शासनकाळातील उमिया देवीचे मंदिर तेथे आहे. दोन दिवसांचा हा लग्न समारंभ साध्या पद्धतीत पार पडला. लग्नात काही मित्रमंडळी आणि नातेवाईकांना आमंत्रीत करण्यात आले.

 

किंजल पारीख नुकताच पदवी परीक्षा पास झली आणि ती आता कायद्याचा  आभ्यास करत आहे. किंजल पारीख विरामगाव जिल्ह्यातील असून तिचे कुटुंब सूरत येथे वास्तव्यास आहे. हार्दिक पटेल अहमदाबादच्या विरामगाव येथील चंदन नगरी गावातील मुळ निवासी आहे. 

हार्दिक पटेल आणि किंजल पारीख हे दोघे लहानपणापासूनच एकमेकांना ओळतात. हार्दिकचे वडील भरत पटेल आणि किंजलचे आई-वडील यांच्या सहमतीने 27 जानेवरीच्या मुहूर्तावर दोघांचे लग्न करण्याचे यो़जीले.