अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मागच्या २०१२ सालच्या निवडणुकीत याच मतदारसंघात ७०.७५ टक्के मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यांत ८९ जागांसाठी मतदान घेण्यात आलं. या टप्प्यात ९७७ उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं.
मुख्यमंत्री विजय रुपाणी, काँग्रेसचे शक्तिसिंग गोहिल, परेश धनानी या दोन्ही पक्षांमधल्या मोठ्या नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं.
गुजरात निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.