अहमदाबाद: महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे चारही राज्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. गुजरातमधील अनेक शहरे पुराच्या विळख्यात सापडली आहेत.
स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अशात मोरबीमध्ये पुरात अकडलेल्या दोन मुलींना पृथ्वीराज सिंह जाडेजा पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपल्या खांद्यावर उचलून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पृथ्वीराज जाडेजा यांचे कौतुक होत आहे.
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
#WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung
— ANI (@ANI) August 11, 2019