मोरबी : गुजरातच्या मोरबीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबीच्या मच्छू नदीत पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मुख्य म्हणजे पूल कोसळला तेव्हा या पुलावर अनेक लोक असल्याची माहिती आहे. हा पूल तुटल्याने लोकं नदीत पडले. यामध्ये एकूण 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
पूल पडण्याची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या मृतांचा आकडा 91 वर असून हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये अनेक लोकं जखमी असल्याचीही माहिती आहे.दरम्यान यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी नूतनीकरणानंतर केबल पूल पुन्हा सुरू करण्यात आला. पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडलेत. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. पूल कोसळल्यानंतर नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने प्रयत्न सुरु होते.
गेल्या अनेक वर्षांपासून त्याची वेळोवेळी दुरुस्ती केली जात होती. हा पूल दिवाळीला खुला होण्यापूर्वी सात महिने दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी या पुलावर पोहोचले आणि तेव्हाच ही दुर्घटना घडली. हा १.२५ मीटर रुंद पूल दरबार गड पॅलेस आणि लखधीरजी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जोडतो. त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
राजकोट जिल्ह्यापासून 64 किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा पूल लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. म्हणूनच अभियांत्रिकी कला आणि जुना पूल असल्याने तो गुजरात पर्यटनाचा विषय बनला होता. नवीन वर्षात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यापूर्वी हा पूल सात महिने बंद होता, त्याची डागडुजी सुरू होती. ते उघडल्यावर तज्ज्ञांच्या मदतीने दुरुस्त केल्याचे सांगण्यात आले.