Gujarat Election Result 2022 : गुजरात काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालानंतर आमदार तातडीनं अज्ञातवासात!

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujrat Assembly Election Result 2022) संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

Updated: Dec 8, 2022, 09:01 AM IST
Gujarat Election Result 2022 :  गुजरात काँग्रेसचा मोठा निर्णय; निकालानंतर आमदार तातडीनं अज्ञातवासात!  title=
Gujarat Election Result 2022 live updates congress to send mlas to unknown place

Gujarat Election Result 2022 :  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujrat Assembly Election Result 2022) संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकूण 2 टप्प्यात पार पडलेल्या मतदानानंतर आता (Vote Counting) मतमोजणीच्या दिवशीच ही माहिती समोर आल्यामुळं विरोधकांच्याही नजरा वळल्या आहेत. कारण, निवडणुकीनंतर होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी म्हणून गुजरात काँग्रेसच्या आमदारांना तातडीनं अज्ञातस्थळी नेण्यात येणार आहे. गोव्यामध्ये झालेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा :  LIVE Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजप - 123, काँग्रेस - 42 तर आप - 3

गोव्यात काय झालं होतं? (Goa assembly elections)

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठीच्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची ताकद होती. पण, सत्तास्थापनेसंबंधीचा निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यामुळं भाजपनं संधी साधत सत्ता स्थापनेत बाजी मारली होती. सर्वात मोठा पक्ष असतानाही काँग्रेसनं सत्ता स्थापनेची संधी हातची जाऊन दिली. हीच चूक टाळण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना अज्ञातवासात नेणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

हेसुद्धा वाचा : हिमाचल प्रदेशात भाजप- काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर! 

गुजरातमध्ये मतदारांचा कौल कुणाला ? 

एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार (Exit Poll) भाजपला (Bjp) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण, आता हे चित्र मतमोजणीनंतरच (Vote Counting) अधिक स्पष्टरित्या समोर येईल. गुजरातमधील जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. इथं विधानसभेच्या 182 जागांसाठी मतमोजणी होणार आहे. यामध्ये काँग्रेसचा करिष्मा पाहायला मिळणार की, भाजपकडेच सत्तेच्या चाव्या कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.