नवी दिल्ली : गुजरात विधानसभेत आज लोकशाहीचा अपमान झालाय. इथे दोन आमदार आपसात भिडले. दोघांनी ऎकमेकांवर केवळ शाब्दिक हल्लाच नाहीतर धक्काबुक्कीही केली. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. कॉग्रेसच्या आमदाराने तर सभागृहातील माईकने भाजपच्या आमदारावर हल्ला केला. दोन्ही आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विधानसभेत प्रश्नकाळात हा गोंधळ झाला. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी एका कारणावरून कॉंग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. याचे उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार विक्रम मादम उभे झाले तेव्हा स्पीकरने त्यांना बोलू दिलं नाही. त्यानंतर स्पीकरने त्यांना निलंबित केले. अशातच कॉंग्रेसचे आमदार अमरीश डेर, मादम यांच्या समर्थनासाठी समोर आले.
दरम्यान, भाजपचे आमदार जगदीश पांचाल यांनी डेरसाठी काहीतरी बोलले आणि ते भडकले. यादरम्यान कॉंग्रेस आमदार प्रताप दुधात यांनी टेबलवरील माईक उखडून काढला आणि पांचाल यांच्यावर हल्ला केला. यावर पांचाल म्हणाले की, डेर यांच्यावर मी काहीही वक्तव्य केलं नाही. अशात आमदार अल्पेश ठाकोर यांनी आरोप लावला की, भाजप आमदारांनी डेर यांच्या अपशब्दांचा वापर केला.
या घटनेनंतर प्रताप दुधात यांना एका सेशनसाठी सस्पेंड करण्यात आलंय. तेच कॉंग्रेस आमदार अमरीश डेर यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलंय. त्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यामुळे सभागृहातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी गोंधळ घातला आणि हाणामारी सुरू झाली.
दरम्यान, कॉंग्रेस आमदार अमरीश डेर ज्यांन मार्शलकडून सभागृहाबाहेर काढण्यात आलं होतं. ते दुस-या गेटने आत आले आणि भाजप आमदारावर हल्ला केला. भाजपच्या आमदारांनी डेर यांना खाली पाडलं आणि नंतर चांगली हाणामारी झाली.