३० जूनला संसदेचं ऐतिहासिक सत्र, अर्ध्यारात्री होणार जीएसटी लॉन्च

रात्री १२ वाजता लॉन्च होणार जीएसटी कायदा

Updated: Jun 20, 2017, 01:54 PM IST
३० जूनला संसदेचं ऐतिहासिक सत्र, अर्ध्यारात्री होणार जीएसटी लॉन्च title=

नवी दिल्ली : संसदेचं ऐतिहासिक असं सत्र येत्या ३० जून रोजी होणार आहे. अर्ध्यारात्री देशाच्या सर्वात मोठा टॅक्स सुधार जीएसटी कायदा लागू होणार आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते ते लॉन्च केलं जाणार आहे. ही वेळ १५ ऑगस्ट १९४७ प्रमाणे उत्साहाचा असेल. सरकार पहिल्यांदा केंद्रीय हॉलचा वापर नव्या टॅक्स कायदा लागू करण्यासाठी करणार आहे.

३० जूनला रात्री ११ वाजता हे सत्र सुरु होणार आहे. अर्ध्या रात्री एक घंटा वाजून जीएसटीची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य वक्त असणार आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार संसदेच्या या केंद्रीय हॉलमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवगौडा हे देखील सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात सर्व राज्याचे मुख्यमंत्र्यांना देखील बोलावण्यात आलं आहे. यासोबतच जीएसटी काउंसिलचे सदस्य देखील या कार्यक्रमात अतिथी असतील. 

जीएसटी काउंसिलने १७ वेळा बैठका घेऊन हा कायदा तयार केला आहे. आधी जीएसटी विज्ञान भवनमध्ये लॉन्च करण्यात येणार होतं पण नंतर ते संसदेच्या केंद्रीय हॉलमध्ये घेण्याचं ठरलं. या कार्यक्रमात लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य, सर्व राज्यांचे वित्तमंत्री हे देखील सहभागी होणार आहेत. 

केरळमध्ये देखील पुढच्या आठवड्यात हे कायदा बनेल. जीएसटीनंतर काही गोष्टींचा सुरुवातीला सामना करावा लागेल. जीएसटीममुळे 2,000 अरब डॉलर पेक्षा अधिकच्या अर्थव्यवस्थेला नवं रुप मिळणार आहे.