भर मंडपात नवरदेवाने नवरीकडे मागितलं किस; पुढे नवरीने जे केलं ते पाहून युजर्स हैराण

सोशल मीडियावर सध्या ट्रेंण्ड आहे तो म्हणजेच लग्नाच्या व्हिडिओचा. यामध्ये कधी वधू-वराच्या जबरदस्त एंट्रीचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

Updated: Jan 7, 2023, 07:07 PM IST
भर मंडपात नवरदेवाने नवरीकडे मागितलं किस; पुढे नवरीने जे केलं ते पाहून युजर्स हैराण title=

मुंबई : व्हायरल व्हिडिओंचा (Viral Video) सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. कधी काही गाड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर कधी सोशल मीडियावर निसर्गाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र आता एक असा एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल यात काही शंका नाही. हा व्हिडिओ आहे एका लग्नातला. ज्यात वधू-वराची स्टाईल पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

सोशल मीडियावर सध्या ट्रेंण्ड आहे तो म्हणजेच लग्नाच्या व्हिडिओचा. यामध्ये कधी वधू-वराच्या जबरदस्त एंट्रीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी वधू-वराची रोमँण्टिक स्टाईल पाहायला मिळते. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरमालाच्यावेळी वर आपल्या वधूकडे किस मागत आहे. 

वधूने त्याचे चुंबन घेईपर्यंत जयमाला न घालण्याचा तो आग्रह धरतो.  मात्र वधूच्या स्टाईलने मात्र सोशल मीडिया युजर्स घायाळ झाले आहेत. वधूची ही रोमँण्टिक स्टाईल सध्या युजर्सच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओत पुढे वधू वराच्या गालावर किस करते. आणि त्याच्या गळ्यात लग्नाची माळ घालते. सध्या वधू वराचा हा रोमँण्टिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 येथे व्हिडिओ पहा
वधू-वरांचा हा रोमँटिक व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेडिंग्सफेव्हर नावाच्या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'दोघं किती क्यूट आहेत?' या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.