'ती कधीच शरीरसंबंध ठेवणार नाही आणि...'; वधूपित्याच्या 3 अटी ऐकून नवऱ्याला बसला धक्का

Bride Refused Groom After Marriage: ठरल्याप्रमाणे लग्न पार पडलं. यामध्ये टिळ्याचा कार्यक्रम, वरमाला घालणे, सप्तपदीसारख्या सर्वच विधींचा समावेश होता. मात्र जेव्हा नवरीला निरोप देण्याचा वेळ आला तेव्हा तिच्या वडिलांनी नवऱ्याच्या घरच्यांसमोर 3 अटी ठेवल्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2023, 09:42 AM IST
'ती कधीच शरीरसंबंध ठेवणार नाही आणि...'; वधूपित्याच्या 3 अटी ऐकून नवऱ्याला बसला धक्का title=
लग्न लागेपर्यंत सर्व काही सुरळीत होत मात्र नंतर जे काही घडलं त्यामुळे सर्वच थक्क झाले

Bride Refused Groom After Marriage: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) झाशी जिल्ह्यात पार पडलेल्या विवाहसोहळ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नानंतर मुलीला निरोप देताना तिच्या वडिलांनी नवरा आणि त्याच्या कुटुंबियांसमोर 3 अजब अटी ठेवल्यात. या अटी ऐकून नवऱ्या मुलाबरोबरच त्याच्या घरच्यांनाही धक्काच बसला. या 3 अटींपैकी एक अट अशी होती की नवरी मुलगी नवऱ्याबरोबर कधीच शरीरसंबंध ठेवणार नाही. हा सारा प्रकार बरुआसागर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सिनौरमध्ये घडला आहे. ज्या मुलाबरोबर हा प्रकार घडला त्याचं नाव मानवेंद्र असं आहे.

...अन् मुलीने लग्नमंडपातच सासरी जाण्यास दिला नकार

समोर आलेल्या माहितीनुसार मानवेंद्रचं लग्न गुरसराय येथे राहणाऱ्या एका मुलीबरोबर ठरलं. लग्नासाठी नवरदेव 6 जून रोजी मुलीच्या घरी जाणार होता. ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस उजाडला तेव्हा मानवेंद्र आणि त्याच्या घरचेही नवीन सून घरी आणण्यासाठी फारच उत्सुक होते. नवरी मुलगी तिच्या मानलेल्या वडील आणि बहिणीबरोबर बरुआसागर येथील लग्नाच्या हॉलवर पोहोचली. नवरा मुलगाही बॅण्डबाजासहीत अगदी वाजतगाजत लग्नाच्या हॉलवर दाखल झाला. येथे टिळ्याचा कार्यक्रम, वरमाळा घालणे, साप्तपदीसारखे सर्व विधी पार पडले. मुलीला निरोप देण्याचा वेळ येईपर्यंत सर्व काही अगदी ठीक होतं. मुलाकडे लोक सुनेला घरी घेऊन जाण्यासाठी तयारी करु लागले. मात्र तितक्यात या मुलीने सासरी जाण्यास नकार दिला.

वडिलांनी घातल्या 3 अटी

मुलीने सासरवडीला जाण्यास नकार देण्यामागील कारण ठरलं या मुलीच्या वडिलांनी नवरा मुलगा आणि त्याच्या घरच्यांसमोर ठेवलेल्या 3 अटी. दोघे कधीच शरीरसंबंध ठेवणार नाही अशी या वडिलांची पहिली अट होती. आपल्या लहान बहिणीबरोबरच मुलगी सासरी जाईल अशी दुसरी अट या मुलीच्या वडिलांनी ठेवली. तर मुलीच्या वडिलांनी तिसरी अट अशी ठेवली की मी कधीही, कोणत्याही वेळी मुलीच्या सासरी येऊन तिला भेटू शकतो यामध्ये मला कोणीच आडकाठी आणू शकत नाही. या 3 अटी नवऱ्या मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी मान्य केल्या नाही. त्यानंतर संपातलेल्या या तरुणीने सासरी जायलाच नकार दिला. वडिलांनी घातलेल्या अटींचा नवऱ्याच्या घरच्यांनी मान ठेवला नाही म्हणून नवरी लग्न करुन थेट तिच्या वडिलांच्या गुरसरायमधील घरी परतली.

अधिकृत तक्रार नाही

नवऱ्या मुलाने लग्नामधील या गोंधळानंतर अचानक अशा अटी का ठेवण्यात आल्या हे कळलं नाही असं म्हटलं आहे. लग्न ठरवताना या अटींसंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती असं नवरदेवाचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.