लग्नात हार घालताना नवरीने दाखवला अ‍ॅटीट्यूड, नवऱ्याने संतापून...पाहा VIDEO

लग्नात नवरीचा अॅटीट्यूड,नवऱ्याने जे केलं ते पाहुन संपुर्ण नातेवाईकांना बसला आश्चर्याचा धक्का, VIDEO पाहिलात का? 

Updated: Aug 30, 2022, 06:56 PM IST
 लग्नात हार घालताना नवरीने दाखवला अ‍ॅटीट्यूड, नवऱ्याने संतापून...पाहा VIDEO  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगत असते. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्नातला आहे. नेमकं या लग्नात असं काय घडलंय, जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे ते जाणून घेऊयात. 

व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत लग्न सोहळा सुरु आहे. या सोहळ्यात नवरा-नवरी एकमेकांना हार घालतं आहेत. सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडतोय. या लग्नसोहळ्यात नवरी खुपचं अॅटीट्यूड दाखवताना दिसत आहे. नवरीच्या या अॅटीट्यूडला  नवरा कंटाळलेला दिसत आहे. 

दरम्यान आजकाल लग्नात हार घालताना नवरा-नवरीमध्ये एक वेगळीच स्पर्धा रंगताना तुम्ही पाहिली असेल. नवरी हार घालताना नवऱ्याचे मित्र त्याला खांद्यावर उचलतात जेणेकरून नवरीला हार घालता येऊ नये. यावर मग नवरी कडचे काय कमी आहेत का? नवरीचे भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला उचलून नवरीला हार घालतातचं, असे अनेक लग्नात आपण पाहिले असेलच. 

व्हायरल झालेल्या घटनेत देखील अशीच घटना घडलीय. नवरा नवरीला हार घालायला जातो. मात्र नवरी मागे होऊन त्याला हार घालण्यास थोडा अडथळा आणतेय. असे अनेकदा केल्यानंतर नवरा वैतागतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. काही सेकंदाने तो पुन्हा एकदा उठतो आणि गुडघ्यावर बसतो. नवरा गुडघ्यावर बसल्यानंतर पत्नी सुद्धा खाली वाकून त्याचा हार गळ्यात स्विकारते. आणि अशाप्रकारे ही विधी यशस्वीरीत्या पार पडते.

दरम्यान नवऱ्याच्या या कृतीनंतर सर्वंच नातेवाईकांना सुखद धक्का बसतो. नवऱ्याने दाखवलेल्या या मुली प्रती आदराची आता सर्व लग्न मंडपात चर्चा आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला तुफान लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.