टीव्ही, मोबाईलवरील सीमाशुल्कात वाढ

उत्तर भारतात सध्या थंडीचा कहर सुरु आहे. यादरम्यानच वॉटर हीटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क अर्थात कस्टम ड्युटी वाढवण्यात आलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 15, 2017, 07:23 PM IST
टीव्ही, मोबाईलवरील सीमाशुल्कात वाढ title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात सध्या थंडीचा कहर सुरु आहे. यादरम्यानच वॉटर हीटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क अर्थात कस्टम ड्युटी वाढवण्यात आलीये.

वॉटर हीटरवरील सीमाशुल्क(कस्टम ड्युटी) १० टक्क्यांवरुन वाढवून २० टक्के करण्यात आलीये. ज्या वस्तूंवरील सीमाशुल्क वाढवण्यात आलेय त्यामध्ये वॉटर हीटरशिवाय टेलिव्हिजन, मोबाईल फोन आणि प्रोजेक्टर यांचा समावेश आहे. 

हेअर ड्रेसिंगशी संबंधित इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवरही २० टक्के कस्टम ड्युटी द्यावी लागणार आहे. कम्प्युटर मॉनिचर आणि प्रोजेक्टरवरील सीमाशुल्क दुपटीने वाढवून २० टक्क्यांवर आणलेय.

मोबाईल फोन आणि पुश बटनवाले टेलिफोनवरील सीमाशुल्कात वाढ करुन ती १५ टक्के करण्यात आलीये. याआधी या उत्पादनांवर शून्य टक्के सीमाशुल्क होते. 

टेलिव्हिजनवरील सीमाशुल्क १० टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर वाढवण्यात आलीये. 

सरकारने या उत्पादनांवरील सीमाशुल्कात वाढ करत घरगुती उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासह यांची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करतेय. दरम्यान, थंडीचा मोसम सुरु असतानाच वॉटर हीटरसारख्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्याने लोकांच्या खिशाला थोडा त्रास सहन करावा लागेल.