महिला पॅनकार्ड धारकांना सरकार देणार 1 लाख रुपये? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

महिलांकडे पॅनकार्ड (Pan Card) असेल तर त्यांना केंद्राकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत. असा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये दावा करण्यात आलाय. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे. याची आम्ही पडताळणी केली.

Updated: May 16, 2023, 09:47 PM IST
महिला पॅनकार्ड धारकांना सरकार देणार 1 लाख रुपये? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? title=

Viral Polkhol : महिलांकडे पॅनकार्ड (PAN Card) असेल तर त्यांना केंद्र सरकारकडून खात्यात पैसे जमा होणार असा दावा करण्यात आला आहे. पॅनकार्ड हे महत्त्वाचं दस्तावेज आहे. या कार्डशिवाय तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार (Financial Transactions) करु शकत नाही. मात्र, पॅनकार्डधारक महिलांसाठी 1 लाख रुपये मिळणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांना याचीच उत्सुकता लागलीय. पैसे खरंच मिळणार आहेत का...? पैसे मिळणार असतील तर काय करावं लागणार...? याची माहिती मिळणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये (Viral Message) काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज
केंद्र सरकारकडून पॅनकार्ड असलेल्या सर्व महिलांना खूशखबर. महिलांना एक लाख रुपयाची रोख रक्कम देत आहे. हा दावा केल्यानं आम्ही अशी कोणती योजना आहे का? हे सरकारच्या वेबसाईटवर (Government Website) जाऊन पाहिलं. मात्र, सरकारने या योजनेची माहिती कुठेही प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली चला पाहुयात. 

व्हायरल पोलखोल
केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबवलेली नाही. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आलं. महिलांबाबत खोटी माहिती व्हायरल केली जातेय (False information goes viral). योजना सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती सरकार देतं. 

सोशल मीडियावरून खोटी माहिती व्हायरल करून दिशाभूल केली जाते. हा मेसेजही महिलांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे असे मेसेज पाहून विश्वास ठेवू नका, आणि पैसे मिळणार म्हणून कोणतीही प्रक्रिया करू नका...तसंच कोणतेही कागदपत्र देऊ नका...आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय.

पॅन कार्ड म्हणजे काय?
PAN म्हणजे कायम खातं क्रमांक म्हणजे परमनन्ट अकाऊंट नंबर. पॅन कार्ड अंतर्गत 10 अंकी क्रमांक दिला जातो. जो आयकर विभागाकडून व्यक्ती, कंपनी किंवा एखाद्या फर्मला दिला जातो. पॅन कार्डची प्रक्रिया सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) अंतर्गत येते. यात त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, जन्मतारिख, स्वाक्षरी आणि फोटो ही आवश्यक माहिती असते. बँक खातं उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड हे महत्त्वाचं ओळखपत्र ठरतं.

देशात राहाणाऱ्या प्रत्येक स्त्री, पुरुष, विद्यार्थी पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. पॅन कार्ड केवळ व्यक्तीच नाही तर कंपनी, पार्टनरशिप फर्मला दिलं जातं. शिवाय ज्या संस्था कर भरतात त्यांनाही पॅन कार्ड अनिवार्य आहे.