पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी

पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Updated: Jun 30, 2017, 06:45 PM IST
पेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

उद्यापासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होतोय. यानिमित्त गडकरीं झी 24 तासशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. विविध वस्तू आणि सेवांचे चार स्तर करण्यात आले असून त्याला शून्य ते 18 टक्के कर लागणार आहे. 

मात्र यातून पेट्रोल-डिझेल आणि दारूला वगळण्यात आलंय. मात्र आगामी काळात हा निर्णय बदलला जाऊ शकतो, असे संकेतही गडकरींनी दिलेत.

दरम्यान, जीएसटी हे काँग्रेसचंच अपत्य आहे तर मग काँग्रेस कशासाठी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सुभाष भामरेंनी उपस्थित केलाय.