आता तुमचा विमानप्रवासही होणार महाग? पाहा काय आहे केंद्र सरकारचा निर्णय

केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.

Updated: Aug 11, 2022, 03:58 PM IST
आता तुमचा विमानप्रवासही होणार महाग? पाहा काय आहे केंद्र सरकारचा निर्णय title=

Airplane Fare Band Removed: देशांतर्गत विमानसेवेवर लावण्यात आलेली भाड्यावरील मर्यादा 31 ऑगस्टपासून हटवण्यात येणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोना महामारीनंतर विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर सरकारने विमान तिकिटांच्या किमतींमध्ये अनपेक्षित वाढ रोखण्यासाठी उड्डाणाच्या कालावधीनुसार तिकीट दरांवर किमान आणि कमाल फेअर बँड लागू केला होता. मात्र आता तो काढून टाकण्यात येतील असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

आगामी सणासुदीपासून विमान प्रवासाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. इंधनाच्या वाढत्या किमती सध्या भडसावणारा प्रश्न आहे. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की दैनंदिन मागणी आणि विमान इंधन (ATF) किमतींचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर विमान भाडे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशांतर्गत कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 31 ऑगस्ट 2022 पासून भाडे मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे एटीएफच्या किमती गेल्या काही आठवड्यांत विक्रमी पातळी गाठल्यानंतर खाली आल्या आहेत.