मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या मुदत ठेवी (FD) वर उपलब्ध व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.
बँकेच्या वेबसाइटनुसार, सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही 2ते 3 वर्षांचा FD ठेवला तर तुम्हाला त्यावरील व्याजदर वाढवून मिळेल.
हा व्याजदर पूर्वी 5.10% होता जो आता बदललेल्या नियमानुसार 5.20% झाला आहेत. दरम्यान, 2-5 वर्षांसाठी FD व्याजदर 15 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.45% केले आहेत. यापूर्वी यावर 5.30 टक्के दराने व्याज मिळत होते.
तसेच 5-10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी, व्याज दर 5.50% पर्यंत केले आहेत. २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर सुधारित व्याजदर लागू होतील.
परंतु अल्प-मुदतीच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही. 1 ते 2 वर्षांच्या FD वर 5.10% दराने व्याज उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही FD 2 वर्षापेक्षा कमी ठेवली तर तुम्हाला जो आहे तोच, व्याज वाढवून मिळेल.
211 दिवस-1 वर्ष कालावधीच्या FD वरील दर सध्या 4.40% वर ठेवले आहेत. यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 180-210 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी व्याज दर 4.40% वर ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही.