एसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या खातेधारकांना आता एटीएममधून दररोज दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे.

Updated: Oct 22, 2017, 08:32 AM IST
एसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये title=

मुंबई : भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या खातेधारकांना आता एटीएममधून दररोज दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर देशभरातील बँकाकडून एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. सध्या खातेदार आपल्या बँकेच्या एटीएममधून दिवसाला ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकते. 

एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलीये. यात एसबीआयने एक डेबिट कार्ड लाँच केलेय. या कार्डाच्या सहाय्याने तुम्ही दररोज एटीएममधून २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. इतकंच नव्हे तर एसबीआयचे खातेदार या डेबिट कार्डद्वारे दररोज ५ लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करु शकतात. 

एसबीआयच्या क्लासिक डेबिट कम एटीएम कार्ड(SBI Classic Debit-cum-ATM Card) द्वारे दररोज ४० हजार रुपये काढता येऊ शकतात. याच डेबिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही ५० हजार रुपयांपर्यंतचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनही करु शकता. 

एसबीआय प्राईड मास्टर डेबिट कार्ड एटीएम कार्ड(SBI Pride Master Debit-cum-ATM Card)ने तुम्ही दररोज एटीएममधून एक लाखांपर्यंतची रक्कम काढू शकता. हे कार्ड देशात तसेच परदेशातही वापरता येऊ शकते. तसेच या डेबिट कार्डद्वारे तुम्ही दोन लाखांपर्यंतचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करु शकता. 

एसबीआय प्लॅटिनम डेबिट-एटीएम कार्डद्वारे तुम्ही देशात आणि परदेशातूनही दररोज दोन लाखांपर्यंतची रक्कम काढू शकता. तसेच या कार्डद्वारे तुम्ही ५ लाख रुपयांपर्यत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करु शकता.