नवी दिल्ली : सोनं व्यापाऱ्यांची घटलेली मागणी आणि कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळ्यानं घटले आहेत. सोन्याची किंमत ३१,४५० रुपये प्रती तोळा झाली आहे. चांदीची किंमत मात्र ७० रुपयांनी वाढून ३८,१५० रुपये झाली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी तणाव वाढल्यामुळे आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली आहे.
दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३१,४५० रुपये प्रती तोळा आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३१,३०० रुपये प्रती तोळा आहेत. शुक्रवारी सोन्याचे भाव ५० रुपयांनी वाढले होते. ८ ग्राम सोन्याच्या बिस्किटांचा भाव २४,५०० रुपयांवर कायम आहे.